अभिनेते पंकज धीर यांची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी...चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई – ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांची बऱ्याच काळापासून सुरु असलेली कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. यावेळी त्यांचे वय ६८ वर्ष होते.
पंकज धीर यांना कर्करोग झाला होता, त्यावर त्यांनी मात केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज त्यांचे निधन झाले आहे.