"अब तक बच्चन" – अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विशेष गीतसंध्या
२४ अजरामर गाण्यांची कराओके प्रस्तुती; मूव्हेबल बँकराऊंड स्क्रीनचा पहिलाच प्रयोग

कोल्हापूर – बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त, १० ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता, शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे एक विशेष संगीतमय कार्यक्रम "अब तक बच्चन" आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन म्युझिक मास्टर्स स्टुडिओ यांनी केले आहे.
कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील अजरामर २४ गाण्यांची कराओके ट्रॅकवर सादरीकरणे कोल्हापुरातील नामवंत कलाकारांकडून करण्यात येणार आहेत. खास बाब म्हणजे, या कार्यक्रमात कोल्हापुरात पहिल्यांदाच मूव्हेबल बँकराऊंड स्क्रीनची संकल्पना सादर केली जाणार आहे, जी कार्यक्रमात दृक्-श्राव्य अनुभव अधिक समृद्ध करणार आहे. म्युझिक मास्टर्स ग्रुपचे ऍडमिन संदीप व्हटकर, सुजित दिंडे, उदय डाकवे व मयूर पाटील यांनी कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांना या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.