अभिनेता शाहरुख खानच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस 

<p>अभिनेता शाहरुख खानच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस </p>

नवी दिल्ली - शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित आणि नेटफ्लिक्सला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘Bads of Bollywood’ या डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करत त्यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे शाहरुख खानची कंपनी अडचणीत सापडली आहे.

‘Bads of Bollywood’ या डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये काही वादग्रस्त प्रकरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात आर्यन खान ड्रग्ज केसचाही उल्लेख आहे, ज्यात समीर वानखेडे हे तपास अधिकारी होते. 
वानखेडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, या मालिकेत त्यांच्या भूमिकेचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून त्यातून जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, वानखेडे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, “सर्व पक्षांनी आपले उत्तर लेखी स्वरूपात ७ दिवसांत सादर करावे, त्यानंतर पुढील आदेश देण्यात येतील.”