सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीला हायकोर्टाचा मोठा झटका

मुंबई - आर्थिक फसवणुक प्रकरणी हायकोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका दिला आहे. परदेशी जाण्यापूर्वी 60 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टाने तिला दिले आहे.
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. तरीही त्यांनी 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीसाठी जाण्याची परवानगी मागत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली असून तिला पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.