मी पिडीत कुटुंबाला मदत दिली, पण त्यांनी ती नाकारली...: गौतमी पाटील 

<p>मी पिडीत कुटुंबाला मदत दिली, पण त्यांनी ती नाकारली...: गौतमी पाटील </p>

मुंबई – काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षा चालक विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावेळी गाडीत गौतमी पाटील होती असे आरोप होत होते. परंतु पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीन चीट दिली आहे त्यामुळे या अपघाताशी गौतमी पाटीलचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना गौतमी पाटीलने, “मी त्यामध्ये दोषी नाही. पोलिसांना देखील हे सांगितलं आहे, माझ्याकडून  पिडीत कुटुंबाला मदत देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ती मदत नाकारली” असल्याचे तिने म्हटले आहे.

कार माझी होती पण मी कार मध्ये नव्हते. मला सर्व लोक ट्रोल करत आहेत. कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. मी त्या गाडीत नव्हते, तरीही मला दोषी ठरवलं जात होतं, असंही गौतमीने सांगितले आहे.