यंदाचा केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर...

<p>यंदाचा केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर...</p>

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा या वर्षाचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. 
येत्या ४ ऑक्टोबर रोजी गोविंदराव टेंबे रंगमंदिरमधील देवल क्लबमध्ये सायंकाळी पाच वाजता अशोक सराफ यांना स्मृती पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. 
यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि  अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत अभिनेते विघ्नेश जोशी घेणार आहेत. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी  उपस्थित राहणार आहेत.