धुरंधर 2 ने 16 व्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला...
मुंबई – अभिनेता रणवीर सिंह याच्या धुरंधर 1 या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्यामुळे दिग्दर्शकाने धुरंधर 2 चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने तर पहिल्याच आठवड्यात 1000 कोटींचे कलेक्शन केले. याला प्रेक्षकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता काल शनिवारी 16 व्या दिवशी धुरंधर 2 ने 1523.58 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या चित्रपटामुळे भारतातील नेट कलेक्शन 959. 37 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच भारतातील ग्रॉस कलेक्शन 1148.58 कोटी रुपये इतके झाले आहे. त्यामुळे सध्या धुरंधर 2 बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.