"देऊळ बंद २" चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला...
मुंबई – श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या "देऊळ बंद" या चित्रपटाने २०१५ मध्ये प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. अशीच छाप पुन्हा पाडण्यासाठी "देऊळ बंद २" गुरुवारी २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
"देऊळ बंद" चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी "देऊळ बंद २" ची घोषणा केली होती. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २" चे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करत चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.