कागलच्या ईशानी हिंगेची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ सिझनमध्ये निवड
कोल्हापूर – कागलच्या ईशानी अरविंद हिंगे हिची स्टार प्रवाहाच्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या चौथ्या सिझनमध्ये निवड झाली आहे. या तिच्या निवडीबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ईशानी गेल्या ८ वर्षापासून संगीत क्षेत्रात आहे. तिने विविध नाट्यसंगीत, अभंग, सुगमसंगीत, शास्त्रीय संगीत अशा गायन कला प्रकारांमधून पुणे, मुंबई, नाशिक, सूरत, जयपूर अशा विविध ठिकाणी नावलौकीक केला आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या सिझनमध्ये आठ हजार विद्यार्थ्यांमधून चौदा मुला-मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यात तिची निवड झाली आहे.