दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आमच्या पैशाचं काय केलं ..? अभिनेता शशांक केतकर संतापला
मुंबई – चार वर्षापूर्वी दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे कलाकारांचे मानधन थकवत असल्याचा आरोप काही कलाकारांनी केला होता. त्यावर मंदार देवस्थळी यांनी, मी आर्थिक संकटात असून काही दिवसांनी सर्वांचे पैसे देणार असल्याचं म्हटल होतं . परंतु आता चार वर्षांचा काळ गेला तरी त्यांच्यावर होणारे आरोप काही थांबेनात . अभिनेता शशांक केतकर याने ,मंदार देवस्थळी मानधन थकवत असल्याबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
शशांक केतकर म्हणाला की, मी कायदेशीर कारवाई करतोच आहे, पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि ''हे मन बावरे ''या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा. यासाठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉटसहित पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गयावया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो.
बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही…. सगळ्यांची आहे.
YouTube वर ४ वर्षापूर्वीच्या काही मुलाखती दिसतील त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न दिसतो. आणि आमच्यापैशाचं काय केलं , या बद्दल चकार शब्दही काढत नाही तो, असा संताप शशांक केतकरने व्यक्त केला आहे.