‘या’ अभिनेत्याला विमानतळावर अटक...
आर्थिक फसवणूक प्रकरणी
मुंबई – 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. ही अटक ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी करण्यात आली आहे.
जयने जिम व्यवसायाच्या नावाखाली बनावट कागदपत्रं तयार केली आणि काही दुकानांची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. या दुकानांची विक्री अनेक लोकांना करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जयने एकाच दुकानाची विक्री अनेक व्यक्तींना करून ५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलीस त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी करत आहेत.