मुंबईत भाजपने ‘या’ अभिनेत्रीला दिली उमेदवारी... 

<p>मुंबईत भाजपने ‘या’ अभिनेत्रीला दिली उमेदवारी... </p>

मुंबई – सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी दिली आहे. 
चित्रपट सृष्टीतील छोट्या - मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अभिनेत्री निशा परुळेकर आता राजकारणात नशीब आजमावणार आहेत. त्यांना मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या त्या भाजपमध्ये सांस्कृतिक विभागात सहसंयोजक म्हणून काम करत आहेत.