धक्कादायक : उमेदवारी न मिळाल्याच्या नैराशातून ‘या’ पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखच झाल्या गायब
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजब प्रकार घडला आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या नैराशातून महिला उमेदवारच गायब झाली असल्याची माहिती त्यांच्या पतीनेच दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अर्चना गोंदोळे या शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी आरमोरी नगरपालिकेसाठी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, इतर पक्षातून आलेल्यांना संधी देण्यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. ही गोष्ट अर्चना गोंदोळे यांना सहन झाली नाही इतकी वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहूनही पक्षाने संधी न दिल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आहे. याच विवंचनेतून त्या घरातून निघून गेल्या असल्याचे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे.