अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार..?
पटना – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार येणार हे निश्चित झाले असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
बिहार निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून १४ उमेदवारांना संधी देण्यात आली होती परंतु १४ पैकी एकाही उमेदवाराला एक हजार मतांचा टप्पाही पार करता आला नाही. अनेक ठिकाणी उमेदवारांना NOTA पेक्षाही कमी मते मिळाल्याचे दिसत आहे. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पुढे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब ठरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.