‘...निकालाने धक्का बसण्याची गरज नाही’
खा. संजय राऊतांची बिहार निवडणुकीवर पोस्ट
मुंबई – सध्या बिहार निवडणुकीच्या निकालावर समोर येत असलेल्या आकडेवारीवरून एनडीए आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यावर खा. संजय राऊतांनी, “बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नसल्याची” पोस्ट ट्वीटवर शेअर केली आहे.
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, " निवडणूक आयोग आणि भाजपा यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते ! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवले".