राज्यातील नगरपालिका अन् नगरपंचायतींच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं...उमेदवारांच्या हालचालींना वेग  

<p>राज्यातील नगरपालिका अन् नगरपंचायतींच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं...उमेदवारांच्या हालचालींना वेग  </p>

मुंबई – पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यातील सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. त्यानुसार 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होईल. 3 डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा आयोगाने केली आहे.