आज किंवा उद्यापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार..?

 ...आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद 

<p>आज किंवा उद्यापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार..?</p>

मुंबई – आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. 
त्या अनुषंगाने आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त  दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. 


राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.