आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अँक्शन मोडवर

 

 

कोल्हापूर शहरातील गुन्हेगारांना नोटीस

<p>आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अँक्शन मोडवर</p>

<p> </p>

<p> </p>

कोल्हापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दक्षता घ्यायला सुरुवात केलीय. कोल्हापूर शहरातील चार पोलीस ठाण्यांतर्गत दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या शंभरहून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शंभराहून अधिक गुन्हेगारांना शहर पोलिस उपाधीक्षक कार्यालयात बोलवून घेत त्यांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारहाण, दमदाटी, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संतोष डोके, संजीव झाडे आदी उपस्थित होते.