स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतिक्षा आणखीनच वाढली
सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींची प्रतीक्षा आणखीनच वाढली आहे.
मुदतवाढ मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा, सणसमारंभासह वेगवेगळी कारणं दिली होती. न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत त्यांना निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.