मनसेच्या अविनाश जाधव यांना झटका...

खडेबोल सुनावत कोर्टाने बिनविरोध उमेदवारांच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली

<p>मनसेच्या अविनाश जाधव यांना झटका...</p>

मुंबई – राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध उमेदवारांच्या निवडीविरोधात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेतील याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीची विधानं केली. रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे कोर्टाने सांगितले. मात्र, यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही. त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.