गद्दारांना जागा दाखवा : बिंदू चौक परिसरात आ. सतेज पाटील गरजले

<p>गद्दारांना जागा दाखवा : बिंदू चौक परिसरात आ. सतेज पाटील गरजले</p>

कोल्हापूर – विरोधातील जे उमेदवार आहेत त्यांना सर्वकाही दिले तरी ते सोडून गेले. त्यांनी गद्दारी केली असे म्हणत आ. सतेज पाटील यांनी शायरीतून सर्वांचा समाचार घेतला. यासह ज्यांनी मला फसवलं त्यांना तुम्ही जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारा मधील काँग्रेसचे उमेदवार रियाज अहमद सुभेदार, स्वालिया साहिल बागवान, अनुराधा अभिमन्यू मुळीक, ईश्वर शांतीलाल परमार यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक महात गल्ली येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

 या सभेत आमदार सतेज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी महायुतीवर सडकून टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आदिल फरास आणि गणी आजरेकर यांच्यावर घणाघाती टीका केली.

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी, कोल्हापूरच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ द्या, असे आवाहन केले. यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील काँग्रेसचे सर्व उमेदवार, प्रतिष्ठित व्यक्ती, भागातील नागरिक उपस्थित होते.