जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं...
मुंबई – आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले कि, उमेदवारी अर्ज 16 ते 21 जानेवारी या दरम्यान भरता येणार आहे तर अर्जांची छाननी 22 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीचा अखेरचा दिवस 27 जानेवारी असणार आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होईल तर मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार आहे.