काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगाचा प्रचाराबाबत महत्वाचा निर्णय...

<p>काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगाचा प्रचाराबाबत महत्वाचा निर्णय...</p>

मुंबई – राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी आज (13 जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असताना निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 
निवडणूक आयोगाने, निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या आयोगाच्या निर्णयामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे.