प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद...
कोल्हापूर - महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. काँग्रेसचे उमेदवार राहुल शिवाजीराव माने, नंदकुमार किरण पिसे, पल्लवी सोमनाथ बोळाईकर आणि विद्या सुनिल देसाई यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.
संध्याकाळी पाच वाजल्यापासून अंबाई टैंक परिसरात कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले होते. गळ्यात काँग्रेसचे हात चिन्ह असलेले स्कार्फ, हातात झेंडे आणि चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. हलगी-घुमक्यांच्या ठेक्यावर नाचत कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीत चांगलाच रंग भरला. मोहिते पार्क, टाकळकर कॉलनी, पवार कॉलनी, लक्ष्मी टेक मंदिर, सानेगुरुजी, गणपती मंदिर, राजोपाध्येनगर, महादेव मंदिर, जोतीबा मंदिर, साई कॉलनी, बी डी कामगार चाळ, दत्त मंदिर परिसरातून काढलेल्या या फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. उमेदवारांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. रॅली दरम्यान ठिकठिकाणी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. अंबाई टैंक, सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर अशा विविध भागांतून निघालेली ही प्रचारफेरी म्हणजे प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेसच्या विजयाची साक्ष देणारी ठरली.
प्रचारफेरीत संदीप पाटील, बाबासाहेब कांबळे, अनिल भालेकर, उदय सासणे, विनायक मोरे, अमर अपराध, नागोजी पाटील, शामराव माने, अमोल माने, बबलू बोंगाळे, राहुल बोंगाळे, भारत माने, विशाल चव्हाण, महादेव मोरे, प्रीतम वाडेकर, सुनिल शेळके, अक्षय टाकळकर, रेणुका तुरंबेकर, सुवर्णा मोरे, पद्मजा टाकळकर, अजित शिंदे, निलेश पाटील, मनोज ढवळे, प्रभावती शिंदे, मुकुंद दिवशे, पांडुरंग दिवसे, विजय दिवसे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.