कोल्हापूर जिल्हयातील दहा आमदारांनी वर्षभरात केवळ खिसे भरले :  आ. सतेज पाटील यांचा घणाघात

<p>कोल्हापूर जिल्हयातील दहा आमदारांनी वर्षभरात केवळ खिसे भरले :  आ. सतेज पाटील यांचा घणाघात</p>

कोल्हापूर -  जिल्हयातील महायुतीच्या दहा आमदारांनी कोल्हापुरसाठी काय केलं? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित करत, त्यांनी केवळ खिसे भरलेत, असा आरोप केला आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ दौलतनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

सत्तेचा बॅलन्स साधण्यासाठी महानगरपालिकेत काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.  या सभेवेळी उमेदवार धनश्री कोरवी, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, काका पाटील, सचिन टिपकुर्ले यांनी मनोगतं व्यक्त करत काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी उमेदवार पद्मावती पाटील, उमेश पोवार, उत्तम शेटके, आप्पासो पवार, शंभू चव्हाण, संगीता देवेकर, अनुप पाटील, माजी नगरसेविका छाया पोवार, महेश सूर्यवंशी, दीपाली देवेकर, दीपाली देशिंगे, अनिल देवेकर, महेश कोरवी यांच्यासह दौलतनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.