टीईटी दिलेल्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार...

<p>टीईटी दिलेल्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार...</p>

मुंबई – राज्यातील सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आल्याने यावेळेस साडे तीन लाख शिक्षकांनी परीक्षा दिली आहे. या सर्व परीक्षार्थींच्या नजरा अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.
टीईटीचा निकाल १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.  डिसेंबरअखेर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे पेपर परीक्षा परिषदेकडून तपासले जातील आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.