डी. वाय. पाटील टेक्निकल पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड...
कोल्हापूर - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक, महाविद्यालयाच्या मॅकेनिकल विभागातील शुभम पाटील आणि अर्जुन जाधव या दोघांची मुंबई येथील जे. एन. के. प्रा. लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागप्रमुख प्रा. एस. ए. खंकाळ, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए. व्ही. खामकर, प्रा. डी. एस. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.