शिवाजी विद्यापीठाकडून प्रा. उदय पाटील यांना पीएच.डी प्रदान
कोल्हापूर - प्रा. उदय आनंदराव पाटील (शिगाव) यांना आज शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
प्रा. उदय आनंदराव पाटील यांनी “परफॉर्मन्स इम्प्रूवमेंट ऑफ मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना " या विषयावर शोधप्रबंध सादर केला. मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमधील अँटेनाचा आकार कमी करणे व त्याची कार्यक्षमता वाढवणे, या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. ते सध्या शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रा. डॉ. आनंदराव बाजीराव काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय शोधनिबंध पत्रिकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.