माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित; शिक्षण क्षेत्रात खळबळ

<p>माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित; शिक्षण क्षेत्रात खळबळ</p>

बीड : माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे लातूर येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि बीड येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई राज्य शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी १९ नोव्हेंबर रोजी आदेशाद्वारे केली.

शिंदे व फुलारी यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपसंचालकांकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. १६ ऑक्टोबर रोजी समितीने त्यांचा अंतरिम अहवाल शिक्षण आयुक्तांना सादर केला, ज्यात काही प्रकरणांमध्ये अनियमितता आढळल्याची नोंद होती.

शासनाच्या महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियमावलीच्या अंतर्गत दोघांवर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू असून, आदेश लागू असताना शिंदे यांचे लातूर कार्यालय व फुलारी यांचे बीड कार्यालय मुख्यालय म्हणून राहणार आहे