महापालिका शाळा कामकाजात राजकीय हस्तक्षेप नको : कृति समितीची लोकप्रतिनिधींसह शिक्षक संघटनांना विनंती 

<p>महापालिका शाळा कामकाजात राजकीय हस्तक्षेप नको : कृति समितीची लोकप्रतिनिधींसह शिक्षक संघटनांना विनंती </p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या व गुणवत्तापूर्वक व्हाव्यात यासाठी शासनाबरोबर समाजातील काही दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना प्रयत्नशील असतात. त्यामुळेच या शाळा राज्यस्तरापर्यंत आपली चमक दाखवत आहेत असं असताना काही शिक्षक आणि शिक्षक संघटना पालकमंत्री आणि  स्थानिक लोकप्रतिनिधी यांची भेट घेवून आपल्या स्वार्थासाठी प्रशासकीय कामकाजामध्ये वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण होतं आहे.


यासाठी आमची पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटनांना  विनंती आहे की, कोणाच्यातरी भिडे खातर सुरळीत प्रशासकीय कामकाजामध्ये आपण  वस्तुस्थिती पाहिल्याशिवाय हस्तक्षेप करू नये आपण सर्वांनी मिळून महापालिकेच्या शाळा कशा अधिक गुणवत्तापूर्वक होतील यासाठी प्रयत्न करूया, शिक्षकांनीही लोकप्रतिनिधींना हस्तक्षेप करण्याची भीड घालू नये.
ज्येष्ठ नेते प्रा . डॉ .एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शाळांच्या कंपनीकरणाचा कायदा शासनाला रद्द करायला लावणारे कार्यकर्ते आहोत याची सर्वांनीच नोंद घ्यावी, अन्यथा अशा लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांच्या अनावश्यक हस्तक्षेपाविरोधात आम्हाला रस्त्यावर यावे लागेल, याची नोंद घ्यावी अशी विनंती
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाव्दारे केली आहे. पत्रावर अशोक पोवार, रमेश मोरे ,राजाभाऊ मालेकर ,चंद्रकांत सूर्यवंशी, कॉ.चंद्रकांत यादव, प्रकाश आमते, लहुजी शिंदे, महेश जाधव, कादरभाई मलबारी, रमेश पोवार, प्रा.शिवाजी पाटील आदींच्या सह्या आहेत.