शिवाजी विद्यापीठच्या लॉन टेनिस स्पर्धेत डी वाय पी साळोखेनगरची प्रियंका देवणे ठरली उपविजेती
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर झोनल लॉन टेनिस स्पर्धेमध्ये साळोखेनगरच्या डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या प्रियंका अमित देवणे हीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
प्रियंका देवणे ही अभियांत्रिकीच्या संगणक विभागाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. या यशामुळे तिची बेंगलोर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली.या यशाबद्दल तिचा संस्थेच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी देवश्री पाटील यांनी, खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि नियमित सराव करणे आवश्यक असते. प्रियंका हिला मिळालेले यश हे उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देईल आणि तिचा आत्मविश्वास वाढेल, असे म्हटले आहे.
कॅम्पस संचालक डॉ अभिजित माने यांनी, विद्यार्थी घडण्यासाठी शिस्त अतिशय महत्वाची असते आणि यशस्वी खेळाडूंची पहिली पायरी शिस्त असते. या यशाने केवळ महाविद्यालयाचेच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले असे म्हटले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील यांनी प्रियंकाचे अभिनंदन केले आहे.
या यशासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, FO प्रशांत कुमार पाटील विभाग प्रमुखCSE डॉ. शिवानी काळे, फिजिकल डायरेक्टर सचिन पाटील या सर्वांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले.