शिवाजी विद्यापीठाकडून जयश्री लोखंडे यांना पीएच. डी. पदवी प्रदान

<p>शिवाजी विद्यापीठाकडून जयश्री लोखंडे यांना पीएच. डी. पदवी प्रदान</p>

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील संशोधक जयश्री सदानंद लोखंडे यांनी बिझनेस मॅनेजमेंट या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांना प्रा. डॉ. सी. एस. काळे यांचे संशोधन प्रबंधाचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या यशामध्ये त्यांना विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, विद्यमान प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एस. महाजन, एमबीए युनिट प्रमुख डॉ. दीपा इंगवले, तसेच प्रा. डॉ. ए. एम. गुरव आणि डॉ. के. व्ही. मारुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.