आता सहावी आणि आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात पहायला मिळणार आयुर्वेदाचे धडे...
									
																		
																											 
																	नवी दिल्ली - सहावी आणि आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचे धडे एनसीआरटीने समाविष्ट केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचे धडे पहायला मिळणार आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांचा आरोग्य, पोषण आणि पर्यावरण याबाबत समतोल दृष्टीकोण निर्माण व्हावा यासाठी याचा समावेश करण्यात आला आहे. सहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या मुळ सिद्धांताची ओळख करून देण्यात येईल. तर आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून दिनचर्या, ऋतूनुसार जीवनशैली यासारख्या विषयांची माहिती देण्यात येणार आहे. यामुळे आयुर्वेदाची समज वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
