शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसने भूषणावह नाही

 

आमदार सतेज पाटील यांचा संताप: इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त

<p>शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसने भूषणावह नाही</p>

<p> </p>

कोल्हापूर - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सेक्शन 11 नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणे आवश्यक होते. विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला आहे पण यासंदर्भात आजअखेर कोणताही निर्णय झालेला नाही. यावर आ. सतेज पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? , असा सवाल उपस्थित केला आहे. 

 

शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिले आहे. नेमकी कोणाची शिक्षणाबाबतची अनास्था याला कारणीभूत आहे ?, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? , ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेले असते. असे असूनसुद्धा पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया करणे तर दूरच; पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत ?, कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा? हाच प्रश्न उद्विग्नतेने आम्ही का विचारू नये ?, असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.