बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

<p>बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ</p>

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन इयत्ता बारावीसाठी परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर होती. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि इतर भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना अडथळे येत होते. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार, शिक्षण मंत्र्यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी चर्चा करून मुदतवाढीचे निर्देश दिले.

या निर्णयानुसार: -

➡️नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत : २० ऑक्टोबर २०२५

➡️बाह्य (External) पद्धतीने परीक्षा देणाऱ्यांसाठी मुदत : १५ ऑक्टोबर २०२५

➡️नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत : १० ऑक्टोबर २०२५

यासंदर्भातील परिपत्रक शिक्षण विभागामार्फत लवकरच जारी करण्यात येणार आहे.