डॉ. ए. के. गुप्ता यांना डायरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड 

‘एज्युस्कीलच्या’वतीने शिमला येथील कार्यक्रमात सन्मान 

<p>डॉ. ए. के. गुप्ता यांना डायरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड </p>

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल एज्युस्किल्स फौंडेशनच्या वतीने  ‘डायरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड – २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.  एज्युस्किल्सचे मुख्य मार्गदर्शक एन. बी. ए. चे माजी अध्यक्ष आणि साऊथ एशियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल आणि एज्युस्कीलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शुभजीत जगदेव यांच्याहस्ते डॉ. गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी डॉ. गुप्ता यांचे अभिनंदन केले.

शिमला येथे येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘एज्युस्किल्स कनेक्ट २०२५’ मध्ये डॉ. गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, उद्योग नेते आणि धोरणनिर्माते उपस्थित होते. 

डॉ. ए. के. गुप्ता हे २०१७ पासून डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ उच्च व तंत्र  शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत असून आउटकम बेस्ड एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०ची अंमलबजावणी, तसेच गुणवत्तावर्धनासाठी विविध शैक्षणिक सुधारणा त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहेत. डॉ. गुप्ता यांना तब्बल ११ वेळा बेस्ट टीचर अवार्ड मिळाला आहे.

शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी ९० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. ३०० हून अधिक तांत्रिक व्याख्याने दिली तसेच ५७ पदव्युत्तर व ४ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून ७ कोटी रुपयांहून अधिक संशोधन अनुदाने मिळवून नवसंकल्पनांना चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांनी  NAAC व NBA मानांकने मिळवली आहेत.

महारष्ट्र राज्य खाजगी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि कृषी महाविद्यालय संघटनेचे सचिव, प्रीएमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा)चे सदस्य  तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक संस्था उभारणी, औद्योगिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास आणि उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील योगदान याची दखल घेऊन 'एज्युस्किल्स'नं त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून अभिनंदन -
या पुरस्काराबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील यांच्याहस्ते डॉ. ए. के. गुप्ता यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी  विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख,  प्राचार्य, पदाधिकारी उपस्थितीत होते. डॉ. गुप्ता यांना मिळालेला पुरस्कार हा संस्थेसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे.यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा हा गौरव असून यापुढील काळातही अधिक चांगले काम त्यांच्याकडून घडेल असा विश्वास यावेळी डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.