माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ' या ' शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्याकरण पुस्तकांचं वाटप

<p>माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ' या ' शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्याकरण पुस्तकांचं वाटप</p>

वसगडे - आज सकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बापुसो पाटील हायस्कूल, वसगडे येथे भेट दिली. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामर पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मदत होणार असून ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास हातभार लागणार आहे.

कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक सागर पाटील, संजय पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, बाळासो उपाध्ये, सचिन पाटील, ग्रामसेवक संगीता विरंभोळे, विद्यासागर पाटील, प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, संतोष कांबळे यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्त उपस्थित होते.