डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शन
कोल्हापूर - कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध आर्किटेक्चर डिझाईन्सचे प्रदर्शन 15 आणि 16 एप्रिल रोजी भरवण्यात येत आहे.
लाईन बाजार येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये ऑल इंडिया इंस्टीटयूट ऑफ आर्किटेक्चरचे नॅशनल कौन्सिल मेंबर व नॅशनल हेरिटेज अँड कॉन्सर्व्हशन समितीचे चेअरपर्सन आर्की. सतीशराज जगदाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, ग्राफिक्स , इंटिरियर डिझाईन, अर्बन डिझाईन तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट आदि विषयांचे ड्रॉईन्ग्स आणि मॉडेल्स मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या कामाबरोबरच त्यांचे इतर अनेक उपक्रम व छंद देखील मांडण्यात येणार आहेत. प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांनी ३D प्रिंटर चा वापर करून विविध मॉडेल्स व कलाकृती केल्या असून त्याचा आर्किटेक्चरल डिझाईन मध्ये कसा वापर करता येतो हे सादर केले आहे. द्वितीय ते चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये व्हॅल्यू एडेड कोर्सेस व अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून कलात्मक व नाविन्यपूर्ण डिझाइन्स केले आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी डिजिटल टेकनॉलॉजि व अद्ययावत सॉफ्टवेअर्स चा वापर करून प्रोजेक्टचे काम सादर केले आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनामागे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची उमेद निर्माण व्हावी हा हेतू आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खुले असणार आहे.
यावेळी माजी विद्यार्थी आर्किटेक्ट अभिषेक नाईक आणि साकिब मुल्ला (बंगलोर) यांचे विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात आले आहे, सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभाग प्रमुख आर्की. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.
अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.