‘या’ जिल्ह्यातील १ हजार ८९६ अंगणवाड्या विजेविना
संभाजीनगर – लहान चिमुकल्यांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाड्यातून होते. त्यामुळे अंगणवाड्या सुसज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. असं असताना संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ८९६ अंगणवाड्या विजेविना चालत असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी २ हजार ६५१ अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीत, तर ७७२ अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. मात्र केवळ ७५५ अंगणवाड्यांकडेच वीज कनेक्शन असून, त्यातील ६३३ अंगणवाड्या नियमितपणे वीज बिल भरत आहेत. त्यामुळे संभाजीनगरमधील बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणावर परिणाम होत आहे.