आता खासगी शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो' ही नावं वापरता येणार नाहीत...
घ्यावी लागणार शासनाची परवानगी
मुंबई - राज्यातील अनेक खासगी शाळा 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो' अशी नावं वापरतात. पण आता या खासगी शाळांना अशी नावं वापरता येणार नाहीत. ही नावं वापरण्यासाठी शाळांना शासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो’ अशी नावं वापरून अनेक खासगी शाळा या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या नावांबाबत असा मोठा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.