आज कोल्हापुरातील १२ हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससीची पूर्व परीक्षा
कोल्हापूर – आज राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली . सकाळी ११ ते १२ या वेळेत एका सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५३ उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ हजार ३१३ विद्यार्थ्यां पैकी १२ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३ हजार ६४७ विद्यार्थीं अनुपस्थित होते . सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रत्येक विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक पडताळणी व स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील सर्व 53 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार किंवा अनियमितता घडलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक कोल्हापूर गजानन गुरव यांनी दिली.