एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा कोल्हापुरात उद्रेक...रस्त्यावर ठिय्या

<p>एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा कोल्हापुरात उद्रेक...रस्त्यावर ठिय्या</p>

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध करण्यात आल्याने आणि वयोमर्यादा वाढवावी, या प्रमुख मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. आज रात्री कोल्हापुरातील विद्यार्थांनी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. शहरातील उभ्या मारुती चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून आयोगाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाहिरात विलंबाने निघाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व करिअरचे नियोजन बिघडले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.