‘या’ ठिकाणी मध्यरात्री एमपीएससीचे विद्यार्थी आले रस्त्यावर... 

आचारसंहितेचे कारण सांगत पोलिसांनी... 

<p>‘या’ ठिकाणी मध्यरात्री एमपीएससीचे विद्यार्थी आले रस्त्यावर... </p>

पुणे – एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध केल्याने आणि वयोमर्यादा वाढीसाठी शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात मध्यरात्री एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे मध्यरात्री पुण्यात मोठा गोंधळ उडाला होता.

यावेळी आचारसंहितेचे कारण सांगत पोलिसांनी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरुन हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती,  त्यामुळे रात्री उशिरा पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडु यांनी ट्वीट करून पाठिंबा दिला आहे.