डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न
कोल्हापूर - कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील पॉलिटेक्निक ,डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक तळसंदे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांचे समूह चर्चा आणि त्यांनंतर मुलाखती झाल्या. घाटगे पाटील इंडस्ट्रीचे डेप्युटी जनरल मॅनेजर सचिन भोसले (एच आर) , विनायक भारती , प्रोडक्शन एजीएम परशराम चौगुले, एच. आर. ऑफिसर रोहन चौगुले यांनी या इंटरव्यू घेतल्या.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे उपस्थित होते.