ही सौहार्दाची लागण वेगानं पसरो..

Share
    राजकारण.. समाजाच्या अत्यंत गरजेचं असून सुध्दा कमालीचं बदनाम झालेलं क्षेत्र. अनेकदा व्यासपीठावरुन जाहीरपणे सांगितलं जातं चांगल्या माणसांनी राजकारणात यावं. याचा दुसरा अर्थ असा होतो आता जे राजकारणात आहेत ते चांगले नाहीत. त्याच बरोबर राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नव्हे असाही सूर उमटतो. एकंदरीत काय तुमच्या आमच्या जीवनावर हे क्षेत्र आणि या क्षेत्रातील मंडळी प्रभाव पाडत असली तरी त्यांच्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. त्यामुळं राजकारण आणि राजकारण्यांची ही प्रतिमा बदलण्याचे जे काही प्रयत्न होतात ते स्वागतार्ह ठरतात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलेले महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांनी आज असाच एक स्तुत्य प्रयत्न केला. त्यांनी पराभूत उमेदवार स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. राजू शेट्टींसह कुटुंबियांशी संवाद साधला. शेट्टींसह त्यांच्या कुटुंबियांनी सुध्दा त्यांचं यथोचित स्वागत केलं.
    
     सार्वजनिक क्षेत्रात घडणार्‍या कोणत्याही घटनेवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरुन एखादं पाऊल टाकायचंच नाही हे योग्य नाही. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या घरी जाण्याचं माध्यमांसह अनेक समाज घटकांमधून स्वागत झालं असलं तरी अनेकांना हे रुचलं सुध्दा नसेल. तशा प्रतिक्रिया सुध्दा येत आहेत. खास करुन निवडणूक काळात आपल्या नेत्यासाठी पायाला भिंगरी बांधून फिरणार्‍या, मीच उमेदवार आहे असं समजून पोटतिडकीनं राबणार्‍या कार्यकर्त्याला नेत्यांचं असं वागणं विचित्रं वाटतं. एरवी कट्ट्यावर "काय न्हाय ओ.. हे सगळे वर एक असतात, आपणच डोस्की फुडून घेतुय". असा सूर उमटतच असतो. त्यामुळे असं काही घडलं की नेत्यासाठी जीव द्यायला तयार असणारा कार्यकर्ता आपल्याच वागण्याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी नेत्यालाच लाखोली वाहायला सुरुवात करतो. ज्या मतदारसंघात राजकारणातला आज नवा पायंडा पडलाय तिथं तर निकालानंतर समाज माध्यमातून ज्या प्रतिक्रिया येत होत्या, काही बैठकांमधून नेत्यांच्या प्रेमाखातर कार्यकर्त्यांनी जी भाषा वापरली त्यातून द्वेष पसरुन दोन समाजात तेढ निर्माण होईल की काय असं वातावरण झालं होतं. राजकीय विचारधारा मागं पडून जाती धर्मापर्यंत कार्यकर्त्यांची ईर्ष्या पोहचली होती. अशा वातावरणात धैर्यशील माने यांनी उचललेलं पाऊल धाडसचाच म्हणावं लागेल. पण त्यांचं हे धाडस कौतुक करण्यासारखंच आहे. आता नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सुध्दा बदललं पाहिजे हे खरंच आहे. माने- शेट्टी भेटीतून इतर नेतेमंडळी बोध घेतील न घेतील पण सगळ्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र आता बोध घ्यायला हवा की आपण कुठं पर्यंत ताणायचं.
 
     खरं तर कार्यकर्त्याची ईर्ष्या हेच नेत्याचं खरं इंधन असतं. त्यामुळं कार्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गानं चार्ज ठेवण्याचं आव्हान नेत्यांसमोर असतं. निवडणूकीच्या काळात तर ही ईर्ष्या टोक गाठते. अनेकदा हे सगळं एकमेकांच्या जीवावर उठण्या पर्यंत पोहचतं. एखाद्या खेळातील जय पराजया प्रमाणंच राजकारणातल्या जय पराजयाकडं बघितलं तर ही टोकाची ईर्ष्या बाळगणं किती फोलपणाचं आहे याची जाणीव होते. पण कार्यकर्त्यांमधील ही ईर्ष्या संपणं कुणालाच नको असतं. कार्यकर्ता मरगळला तर आपलं राजकारण कसं चालणार याची नेत्यांना भीती असते तर आपण नेत्यांसाठी काही करतोय हे दिसलं नाही तर आपलं कसं होणार म्हणून कार्यकर्ता धडपडत राहतो. यातून अनेकदा टोकाचे संघर्ष उभे राहतात. हे असे संघर्ष टाळण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते या दोघांनीही सामंजस्याचं राजकारण करणं गरजेचं आहे. खासदार धैर्यशील माने यांनी त्या दिशेनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. त्यांच्या या निर्णयानं राजकारणाच्या नावानं बोटं मोडणारा मोठा वर्ग सुखावलाय. पण त्यांच्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांकडून आता टोकाच्या भावना व्यक्त होतायत. अशा कार्यकर्त्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. राजकारणात कुणीच कुणाचा सर्वकाळ मित्र आणि शत्रु नसतो या न्यायानं नेते लवचिक भुमिका घेतात, हे सत्य असलं तरी राजकीय स्वार्थ असो वा नसो कार्यकर्त्यांनी आपण किती टोकाची भुमिका घ्यायची हा विचार करणं गरजेचं आहे. समाजातल्या जाणकारांचे यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. आता नेतेमंडळींनीच कार्यकर्त्यांना एका मर्यादेपर्यंत विरोध करण्यासाठी तयार करायला हवं. राजकारणातला विरोध हा कुणाला तरी जीवानिशी संपवण्यापर्यंत पोहचणं हे प्रगल्भतेचं लक्षण नक्कीच नाही. अशा संघर्षातून जिंकणार्‍याच्या आणि हरणार्‍याच्या कुणाच्याही पदरात काय पडतं हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे.

    माने - शेट्टी भेट आजच्या द्वेष हाच राजकारणाचा पाया असलेल्या काळात सर्वसामान्यांसाठी सुखद धक्का आहे. खासदार धैर्यशील माने यांनी आज घेतलेली उदार भुमिका यापुढच्या काळात सुध्दा कायम ठेवली तर अशा भुमिकांवर लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्‍वास बसेल. या भेटी मागील खासदार मानेंचा हेतू शुध्द असणं अपेक्षित आहे तो असायलाच हवा पण त्याचा अन्वयार्थ वेगळा सुध्दा लावला जाऊ शकतो. तसा तो लागू नये हीच अपेक्षा. राजकारणातल्या सौहार्दाची ही लागण वेगानं राज्यात आणि देशात पसरुन अवघ्या राजकारणात ही खिलाडूवृत्ती आली तर लोकशाहीसाठी तो भाग्याचा दिवस असेल.  

अजून वाचा

ही सौहार्दाची लागण वेगानं पसरो..

राहुल गांधी म्हणतायत तर.....

चेहरा हाच पर्याय.

अंडरकरंटच प्रभावी...

अंडरकरंटचाच प्रभाव

उत्सव लोकशाहीचा .. बोटावरच्या शाईचा..