चेहरा हाच पर्याय.
Share
दोन हजार चौदाच्या निवडणूकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मोदी लाटे मुळं हे शक्य झालं असं सामान्यांपासून विश्लेषकांपर्यंत सर्वांनीच मान्य केलं. आताच्या निवडणूकीत अशी कोणतीही लाट असल्याचं प्रत्यक्ष दिसत नसलं तरी भाजपाला जे अक्राळविक्राळ यश मिळालं त्याचं विश्लेषण करताना मोदी लाटच नव्हे तर त्सुनामी होती असं बोललं जातंय. स्वतंत्र भारतात आणि त्यापूर्वी स्वातंत्र्य लढ्यात सुध्दा भारतीय जनता काही काळाचा अपवाद वगळता नेहमी कोणत्या ना कोणत्या जननायकाच्या मागं चालत राहिल्याचं चित्र आहे. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी,देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु त्यानंतर इंदिरा गांधी,जयप्रकाश नारायण आदिंनी इथलं जनमानस प्रभावित केलं.इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींनी ही जागा घेण्याचा प्रयत्न केला. पुढं काँग्रेसला आणि देशाला सुध्दा संपूर्ण देशभरासाठी आश्वासक वाटेल असा चेहरा मिळाला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या कार्यकाळात सोनिया गांधींचं नेतृत्व फारसं आश्वासक ठरु शकलं नाही. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कटचा सोस माणसांना नेहमीच राहिला आहे. चित्रपटांमध्ये खास करुन दाक्षिणात्य चित्रपटांमधून जसं हिरोेची लार्जर दॅन लाईफ इमेज दाखवली जाते तसा नेता जनतेला सुध्दा भावतो. त्या नेत्याचं बोलणं,वागणं हे अनेकदा वास्तवापासून दूर असलं तरी सुध्दा लोकं त्याचा फारसा विचार करत नाहीत. युपीएच्या कार्यकाळातील कारभारावरील नाराज जनता अशाच हिरोच्या शोधात असताना भाजपानं नरेंद्र मोदींना पुढं आणलं.भाजपाचं हे टायमिंग अचूक जुळलं आणि हळूहळू भारतीय जनमनावर मोदींनी आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. दोन हजार चौदाच्या निवडणूकांमध्ये लोकांना वाटू लागलं की आपण ज्याच्या प्रतिक्षेत होतो तो हाच आणि भाजपाच्या पदरात मतांचं दान भरभरुन पडलं. देशाच्या इतिहासात काँग्रेसची सर्वांत मोठी पीछेहाट झाली. पुढं भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या कारभारानं देशातील जनता सुखावली असं नाही. मोदींकडून असणार्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण झाल्याच असं नाही.एकीकडं मेनस्ट्रीम मीडिया मोदींची लार्जर दॅन लाईफ इमेजच लोकांच्या मनावर बिंबवत असताना दुसरीकडं सोशल मीडिया मात्र त्याची दुसरी बाजू लोकांसमोर आणत होता. देशभरातील विद्वान,लेखक,कवी,पत्रकार यासह अनेक बुध्दीजीवी घटकांना ही दुसरी बाजू पटत होती. मोदींचं देशभरात झालेलं प्रतिमा संवर्धन आणि प्रत्यक्ष सरकारचा कारभार यातील तफावत लोकांना स्पष्टपणे दिसत होती. तर दुसरीकडं वास्तवापेक्षा मांडणीला भुलून देशा समोरच्या प्रश्नांचाच विसर पडलेला मोठा समुदाय देशभरात तयार झाला. एका गटाला मोदींच्या नेतृत्वाची दुसरी बाजू पटत असून सुध्दा मोदी नसतील तर कोण हा प्रश्न सतावत होताच. तर दुसरा गट मोदीं शिवाय दुसऱ्या कुणाचा विचारच करण्याच्या तयारीत नव्हता. निवडणूकीत पहिल्या गटाचा प्रभाव वाढत जाऊन नव्या नेतृत्वाला संधी मिळेल असं वाटत होतं पण ते शक्य झालं नाही. भाजपानं सुरु केलेल्या नमो विरुध्द रागा या स्पर्धेत सर्वोत्तम कोण ठरवण्याचे जे निकष जाणीवपूर्वक ठरवले गेले त्यातून दिवसेंदिवस राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचंच काम झालं. काँग्रेस सुध्दा या स्पर्धेत अडकत गेली. आक्रमक प्रचार,प्रखर राष्ट्रवाद या भुमिकांसह लोकांना नेहमी कोणत्या ना कोणत्या इव्हेंट मध्ये गुंतवून ठेवत मुळ प्रश्नांची त्यांना जाणीवच होऊ द्यायची नाही अशा खेळींमध्ये भाजप यशस्वी होत गेला. दुसरीकडं काँग्रेस आणि विरोधकांकडून विचारांची लढाई लढली जात होती पण ते लोकांपर्यंत पोहचत नव्हतं. काँग्रेस असो किंवा अन्य विरोधी पक्ष असोत त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू शेवटी मोदीच होते. त्यामुळं लोकांसमोर निवडीचा प्रश्न उभा राहायचा त्यावेळी पटत असो वा नसो मोदी हाच पर्याय त्यांना जवळचा वाटायचा. लोकसभा निवडणूकीच्या निकालातून हेच दिसून आलं आहे.
देशाचा कारभार ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याची विचारधारा,त्याची सर्वसमावेशकता,त्याचं ज्ञान,कौशल्य या गोष्टींचा विचार व्हायलाच हवा पण लोकांना आपल्या अस्मिता जपणारा नेता अधिक जवळचा वाटतो. हे फक्त भारतातच घडतंय असं नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये कणखर बाण्याचा नेताच सत्ताधीश म्हणून लोकांना हवा आहे. म्हणूनच अमेरिकेत सगळे अंदाज फोल ठरवत हिलरींऐवजी जनतेनं ट्रम्प यांच्या गळ्यात राष्ट्राध्यक्षपदाची माळ घातली,रशियात पुतिनच जनतेला आपले तारणहार वाटतात, चीन मध्ये शी जिनपिंग यांच्यासाठी तर राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळावरील मर्यादा हटवण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला. या व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचाच भारतीय जनतेनं स्विकार केलाय का? असा प्रश्न सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूक निकालानंतर पडतो. मग आज जनतेनं चेहरा म्हणून मोदींना निवडलं असेल तर पुढं मोदींना पर्याय म्हणून दुसरा चेहराच शोधावा लागेल.