अंडरकरंटच प्रभावी...

Share
अखेर सतराव्या लोकसभेचे कारभारी ठरले.एक्झिट पोल जवळपास एक्झॅट पोल ठरले.सुरुवातीचा एक दोन वर्षांचा कारभार सोडल्यानंतर  मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं पण एकाचवेळी कमालीचं कौतुक आणि कमालीचा द्वेष अशा वातावरणात पुढचा कारभार केला.लोकसभा निवडणूकांच्या तीन महिने अगोदर मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड या राज्यांसह उत्तरप्रदेशातील पोटनिवडणूकांमध्ये झालेल्या पराभवानंतर मोदी लाट ओसरल्याचं चित्र दिसू लागलं.काँग्रेससह भाजपविरोधकांचा आत्मविश्‍वास वाढला.मोदी सरकारच्या नोटबंदी,जीएसटीची अंमलबजावणी या सारख्या निर्णयावरुन विरोधकांनी घेरायला सुरुवात केली.काही सरकार योजनांचं अपयश समोर येऊ लागलं. 2014 मध्ये ज्या सोशल मीडियानं भाजप आणि मोदींना सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं तो सोशल मीडिया भाजपासाठी बुमरँग ठरणार अशी भाकितं वर्तवली जाऊ लागली.पण पुलवामा मध्ये दहशतवादी हल्ला झाला,त्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक झालं त्यानं देश एका भावनेवर स्वार झाला.चाणाक्ष मोदी - शहा जोडगोळीनं ही भावना एनकॅश केली.सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित केल्यानं काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष देशासाठी व्हीलन ठरले.महागाई,बेरोजगारी  अशा मुद्दयांवर भाजपाला विरोधकांनी घेरणं सुरु केलं होतं ते मुद्दे मागं पडले. ज्या प्रश्‍नांनी सर्वसामान्यांचं जगणं हैराण झालं त्या प्रश्‍नांकडं सामान्यांनी सुध्दा दुर्लक्ष केलं.सगळ्यांसाठी देशाची सुरक्षितता हाच मुद्दा महत्त्वाचा आहे असं वाटू लागलं.आता भाजपाला मिळालेल्या यशात या राष्ट्रवादाच्या भावनेचा खूप मोठा वाटा आहे हे नाकारुन चालणार नाही.विरोधकांना हा अंडर करंट लक्षातही आला पण त्यावर त्यांच्याकडं कोणताच तोडगा नव्हता .उलट  सर्जिकल स्ट्राईकवरच्या शंका  उपस्थित करण्यासह काही संवेदनशील मुद्दयांवर उथळ प्रतिक्रिया देण्यातून काँग्रेससह अन्य पक्षांचे नेते सुध्दा भाजपानं टाकलेल्या जाळ्यात अडकत गेले आणि सर्वसामान्यांच्या नजरेत ते व्हीलन ठरले.अर्थात पंतप्रधान मोदींचा आक्रमक प्रचार,काँग्रेससह अन्य पक्षांकडे नसलेला सक्षम चेहरा,सरकारचं अपयश लोकांपर्यंत पोहचवण्यात कमी पडलेले विरोधक, मोदी विरोधक एकवटण्यात आलेलं अपयश ही आणि अशी अनेक कारणं सुध्दा भाजपाला बळ देणारी ठरली. पण सर्जिकल स्ट्राईकनं निवडणूकीत ट्विस्ट आणला हे नाकारुन चालणार नाही.आता जनमताचा जो कौल आला आहे तो स्विकारुन विरोधकांनी अधिक प्रगल्भपणे सरकारच्या देशहिताच्या निर्णयांना पाठबळ देणं आणि चुकीच्या निर्णयांविरोधात रान उठवणं गरजेचं आहे.जगातील सर्वांत मोठी लोकशाही अधिक सर्वसमावेशक करणं गरजेचं आहे.

कोल्हापूरच्या अंडरकरंटचाच विद्यमानांना फटका-
         
तसं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासूनच पक्षीय भुमिकां पलिकडे जाऊन अनेक करंट आणि अंडरकरंटनी काम सुरु ठेवले होते.अगोदरच ठरलेल्या भुमिकांमुळे निकाल काय असणार याचा अंदाज बांधणं अवघड नव्हतं.पण प्रा.संजय मंडलिकांनी मिळालेलं विक्रमी मताधिक्य हा एकाचवेळी एकवटलेल्या अंडरकरंटचाच परिणाम असल्याचं स्पष्ट होतं.आपण म्हणजेच पक्ष ही काकांची स्टाईल घेऊन काम करु पाहणार्‍या धनंजय महाडिकांना पक्षातील नेत्यांपासून शेवटच्या कार्यकर्त्याच्या मनातील खदखद ओळखताच आली नाही.ज्यावेळी त्यांनी काही माफीचे प्रयोग पण तोपर्यंत वेळ बरीच पुढं गेली होती.कसंही करुन ,काहीही करुन आपलाच फायदा कसा होईल असं सोयीचं राजकारण करणं,मी,माझं,मला याच्या पलिकडे फारसा विचार न करणं या पध्दतीच्या राजकारणाचा कोल्हापूरकरांना उबग आल्याचंच निकालातून दिसलं.शेणा मुतात हात घालून गोकुळचं वैभव उभा करणार्‍या जिल्ह्यातल्या बायाबापड्यांच्या मनातला असंतोष हा एक मोठा अंडरकरंट ठरला.
          हातकणंगलेत शेतकरी व्होटबँक घेऊन राजकारण करणार्‍या राजू शेट्टींनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं चुकीचं आहे असा मानणारा एक मोठा वर्ग तयार झालाय याचा अंदाजच आला नाही.पण हा एकच अंडरकरंट त्यांच्या पराभवाला कारणीभूत नाही.त्यांच्यावर धैर्यशील मानेंनी घेतलेल्या मताधिक्याचा विचार केला तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तब्बल 73 हजारांचं मताधिक्य हा इचलकरंजीकरांना राजू शेट्टींनी गृहित धरण्याचा परिणाम असल्याचं दिसून आलं.वारणा पाणी योजनेबाबत शेट्टींनी घेतलेली भुमिकेमुळं त्यांच्या विरोधात इचलकरंजीकरांमध्ये तयार झालेला राग हा अंडरकरंट इतका प्रभावी ठरेल हे कुणालाच वाटलं नव्हतं.वंचित बहुजन आघाडी हातकणंगलेत आपला प्रभाव दाखवणार हे उघड गुपित होतं.शेट्टींच्या समर्थकांकडून जातीचा मुद्दा पुढं केला जात असला तरी यापूर्वीच्या दोन निवडणूकांमध्ये शेट्टींना निवडून देताना लोकांनी जातीचा विचार केला होता का? हे जाणून घेणं गरजेचं आहे.
    कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.पण या दोन्ही उमेदवारांच्या विजयात त्यांच्या स्वत:च्या आणि मित्रपक्षांच्या व्होट बँक बरोबरच तात्कालिक आणि काही वर्षांपासूनच्या कारणांमुळं दोन्ही कडील विद्यमानां विरोध तयार झालेले अंडरकरंटचाच अधिक वाटा आहे.   

अजून वाचा

ही सौहार्दाची लागण वेगानं पसरो..

राहुल गांधी म्हणतायत तर.....

चेहरा हाच पर्याय.

अंडरकरंटच प्रभावी...

अंडरकरंटचाच प्रभाव

उत्सव लोकशाहीचा .. बोटावरच्या शाईचा..