अंडरकरंटचाच प्रभाव
Share
एकदाचे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडले. आता सगळ्यांनाच वेध लागले आहेत 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाचे दरम्यानच्या काळात अंदाज अपना अपना म्हणत प्रत्येक जण आपला अभ्यास मांडताना दिसेल. कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज वर्तवणे अनेक निष्णात विश्लेषकांसाठी सुध्दा आव्हानात्मक ठरते. हे गांव लय न्यारं अशीच निवडणूकांच्या बाबतीत कोल्हापूरची ओळख आहे. 2014च्या निवडणूकीत देश एका लाटेवर स्वार झाला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वेगळेच चित्र बघायला मिळाले. येथे उमेदवारांनी एकमेकांचे नव्हे तर मतदारांनी उमेदवारांचे हिशेब चुकते केल्याचा इतिहास आहे. यावेळची निवडणूक सुध्दा त्याला अपवाद ठरेल. असे वाटत नाही पक्षीय अभिनिवेष, राष्ट्रीय मुद्दे, स्थानिक प्रश्न याच्या पलीकडे जाऊन कोल्हापूरच्या निकालांवर काम करतात ते अंडरकरंट.
कोल्हापूरची निवडणूक ध्यानात राहिल.
पक्ष, उमेदवार, नेता यांच्यापेक्षा मतदारांनी निवडणूक हाता मध्ये घेतली तर त्याचा निकाल काय लागू शकतो याचा प्रत्यय 2009च्या लोकसभा निवडणूकीवेळी कोल्हापूरात आला. राज्याच्या देशाच्या राजकारणात मुत्सद्दी आणि मातब्बर समजल्या जाणार्या खासदार शरद पवारांचे अंदाज कोल्हापूरकरांनी चुकवत त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूकीत उतरलेले सदाशिवराव मंडलिक यांची पाठराखण केली होती. यावेळच्या निवडणूक प्रचारात याच निवडणूकीचे दाखल मंडलिक समर्थकांकडून दिले जात होते. ती आणि आताची निवडणूक यातला एक समान धागा बघायला मिळाला तो पक्षनिष्ठा,अजेंडा,विकासकामांचे दावे यापेक्षा तात्कालिक मुद्दे. त्यावेळी माजी खासदार मंडलिकांना तिकिट न देणं कोल्हापूकरांनी मनाला लावून घेतले आणि कोल्हापूरचा स्वाभिमान हा मुद्दा पुढे आणत मतदारच प्रचारक बनला. यावेळी सुध्दा महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत असली तरी ती पक्षांपेक्षा महाडिक विरुध्द मंडलिक अशीच लढली गेली. त्यामुळे दोघांना पाठबळ देणाऱ्यांच्या पक्षांचे विचार आणि त्यांनी घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आढळून आली. या निवडणूकीला स्थानिक पदरच अधिक आढळून आले. आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत जी भुमिका घेतली त्याचच अनुकरण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गटनेत्यांनी केले. महाडिकांमुळे दुखावलेल्यांसाठी ही नामी संधी ठरली. एरवी ज्यांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर विरोध करणे शक्य नव्हते अशांनीही आमचं ठरलंयच्या नावाखाली हिशेब चुकते करण्याची घेतलेली भुमिका निकालाचे अंदाज बांधताना विचारात घेतली नाही तर अंदाज चुकण्याची शक्यता मोठी आहे. राजकारणात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात एका वेळी एकाला, अनेक वेळी अनेकांना फसवता येईल पण सर्व वेळी सर्वांनाच फसवता येत नाही याची शिकवण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निकाल देईल आणि त्यासाठी वेगवेगळे अंडरकरटंच काम करतील यात शंका नाही. त्यामुळे खासदार शरद पवारांसह सर्वांच्याच ही निवडणूक ध्यानात राहिल किंबहुना ती ठेवावी लागेल.
हातकणंगलेतला ट्विस्ट.
हातकणंगलेत खासदार राजू शेट्टींना आव्हान देणारा तगडा उमेदवारच नाही या स्थितीपासून ते निवडणूकीच्या निकालाचा अंदाजच बांधता येणार नाही या स्थितीपर्यंत झालेला बदल अचंबित करणारा ठरला. या मतदारसंघात काही अंशी मुद्यांची चर्चा झाली असली तरी खरी येथे जातीय समीकरणांचाच प्रभाव राहिला. खासदार शेट्टींच्या संघटनेत झालेली वजाबाकी कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या साथीने भरुन निघेल असे त्यांना वाटत असले तरी ती साथ किती मनापासून होती हे महत्त्वाचे आहे. 2009च्या निवडणूकीत केवळ स्वत:चा प्रभाव, 2014 च्या निवडणूकीत सेना भाजपाची साथ आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीची साथ हा खासदार शेट्टींचा प्रवास त्यांचा करिष्मा कमी होत चालल्याचे दर्शक आहे असा तज्ञांचा दावा आहे. तरी सुध्दा पक्ष, अजेंडा, विरोधातील उमेदवार हे सगळे गौण मानत शेतकरी नेता ही त्यांची प्रतिमा खासदार शेट्टींना तारक ठरण्याची शक्यता आहे. धैर्यशील मानेंनी हातकणंगलेत निर्माण केलेली हवा खासदार शेट्टींची दमछाक करणारी ठरली.
वंचितांचा धक्का
मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणार्या वंचितांचा आवाज बनलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या धक्क्याची तीव्रता हातकणंगलेत सर्वाधिक जाणवेल असे चित्र आहे.आम्हाची दखल घ्यावीच लागेल हा वंचित बहुजन आघाडीचा हेतू या मतदारसंघात साध्य होण्याची दाट शक्यता आहे. असो, एकूण जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील निवडणूक पक्ष,धोरणे याच्या पलीकडे एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावरच केंद्रीत झाल्यामुळे निकालावर अंडरकरटचाच प्रभाव राहणार हे नाकारता येणार नाही.