उत्सव लोकशाहीचा .. बोटावरच्या शाईचा..

Share
कुछ दाग अच्छे होते है ! 

’माणसाचं जगणं डाग रहित असावं. पण काही डाग चांगले असतात असं म्हणतात. आज डाव्या हाताच्या तर्जनीला लागलेला शाईचा डाग असाच चांगला, अभिमानानं मिरवण्यासारखा. आज सकाळ पासून अनेकांनी तो मिरवला सुध्दा. ज्यांना हा डाग अजून लागला नाही त्यांनी तो लावून घ्यावा म्हणून हक्कानं सांगितलं जातं. बोटावरचा हा डाग लोकशाहीवर पडलेले डाग पुसून काढण्यासाठी आणि भविष्यात ते पडू नेत म्हणून खूप महत्त्वाचा आहे. आम्ही भारताचे लोक म्हणून घटना स्विकारल्यानंतर त घटनेबरहुकुम कारभार चालवणारे कारभारी निवडण्यासाठी मिळालेला मताधिकार अमूल्य आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत आपली माणसं निवडण्यापासून ते आज देश महासत्तेकडं वाटचाल करत असतानाच प्रत्येक निवडणूकीत भारतीय मतदारांनी दाखवलेली सजगता ही नेहमीच कौतुकाचा विषय राहिली आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात पार पडणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका या लोकशाहीवरची भारतीांची निष्ठा सिध्द करतात. निवडणूकांच्या तायारी पासून त्या निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना याच मोठं श्रेय जातं. स्वातंत्र्यानंतर भारत देश म्हणून टिकणारच नाही असं भाकित वर्तवणाऱ्या धुरिणांना अनेकत्वात एकता जपणाऱ्या भारतीायांनी सणसणीत उत्तर दिलं. आज देशाच्या मोठ्या भागात सतराव्या लोकसभेसाठी मतदान होत असताना लोकशाहीच्या बळकटीकरणात सामील होणं हे तुमचं आमचं सर्वांचंच कर्तव्य आहे. सर्वजण मिळून हे कर्तव्य बजावूाया. मतदारच खरा चौकीदार आपले प्रतिनिधी निवडण्याचा लोकशाहीनं दिलेला अधिकार सजगपणे वापरणारे देशाचे खरे चौकीदार आहेत. हा चौकीदार बाटावा म्हणून दुष्टप्रवृत्ती अनेकदा डोकं वर काढतात. त्याला साड्यांचं, पैशाचं, दारुचं, वस्तूंचं अमिष दाखवणचा प्रत्न होतो .यंदाच्या निवडणूकीत सुध्दा हे घडलं. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खरं तर हे पाच कोटी हिमनगाचं टोक असावं इतक्या प्रमाणात निवडणूका डागाळल्यात. निवडणूकांच्या निमित्ताने लोकशाहीवरचे हे डाग निश्चिंतच चांगले नाहीत. मत हा आपला अधिकार आहे हे जाणणारे असे डाग आपलला लागू देत नाहीत. कोणत्याही अमिषाशिवाय लोकप्रतिनिधी निवडताना प्रत्येकानं आपली चौकीदारी इमाने इतबारे सांभाळणं गरजेचं आहे. मतदान करुाया ..देशाचे खरे चौकीदार बनूया! लोकशाहीचा उत्सव जगाच्या पाठीवरचे अवघे मानव जाती धर्मात विखूरले असले तरी सण, उत्सवांचं साजरं करणं हा सर्वच जातीमर्ममधील समान धागा आहे. रोजच्या धकाधकीतून विरंगुळा देतानाच हे उत्सव जगणसाठी बळ देतात. निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेचा उत्सवचं. उत्सवात सहभागी होणं जितकं आनंद देणारं आहे तितकंच ते जबाबदारीची जाणीव करुन देणारं. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होताना तुम्ही आम्ही सर्वचजण अन्य उत्सवाचं पावित्र्य जपण्यासाठी जसा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न इथं सुध्दा व्हाला हवा. विचारपूर्वक, सद्सद्विवेक जागी ठेवून आपले कारभारी निवडण्याचा हा उत्सव डोळे उघडे ठेवून साजरा करुया... जबाबदार नागरीक बनूया !

अजून वाचा

ही सौहार्दाची लागण वेगानं पसरो..

राहुल गांधी म्हणतायत तर.....

चेहरा हाच पर्याय.

अंडरकरंटच प्रभावी...

अंडरकरंटचाच प्रभाव