कागलमध्ये हॉटेल अशोकाच्या स्वयंपाक घराला आग...

<p>कागलमध्ये हॉटेल अशोकाच्या स्वयंपाक घराला आग...</p>

कोल्हापूर – कागलमध्ये हॉटेल अशोकाच्या स्वयंपाक घराला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

कागल येथील राष्ट्रीय महामार्गालगत, दूरसंचार कार्यालयाजवळ हॉटेल अशोका आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास या हॉटेलच्या स्वयंपाक घरात खाद्यपदार्थ तयार करत असताना कढईचा भडका उडाल्याने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कागल नगरपरिषद तसेच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत हॉटेलच्या स्वयंपाक घरासह साहित्याचे नुकसान झाले आहे.